Ad will apear here
Next
बरसला पाऊस, बहरली प्रतिभा
मुंबई : मान्सून अखेर राज्यात येऊन ठेपला असल्याने बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. पाऊस म्हणजे निसर्गाचा असा आविष्कार, की जो मनामनांवर आनंदाचे अधिराज्य गाजवतो. मोठी माणसे जिथे पावसाच्या आगमनाने प्रफुल्लित होतात, तिथे लहान मुलांची तर गोष्टच न्यारी. आनंद त्यांच्या प्रत्येक हालचालीतून जणू थुईथुई नाचत असतो. चातक पक्षी आणि निसर्गातील प्रत्येक घटक जसा पावसाची वाट पाहतो, तशीत लहान मुलेही मनसोक्त हुंदडण्यासाठी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली असतात. मुलांचा हा आनंद वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतो. मुंबईतील काही लहानग्यांनी आपला आनंद व्यक्त करण्याला विधायक रूप दिले.

समाजप्रबोधनासाठी जागृत असणाऱ्या काही बालचित्रकारांनी वेगळे विषय घेऊन छत्र्या रंगवल्या. मुंबईतील ‘गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट’चे सागर कांबळी यांनी ही माहिती दिली. पाऊस म्हटला, की प्रथम आठवण येते बळीराजाची. या पावसामुळे तरी बळीराजाचे दुःख बरे व्हावे, असा संदेश काही बालचित्रकारांनी छत्र्यांतून दिला. ‘स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई,’ ‘झाडे तोडू नका, झाडे लावा, मुंबईला वाचवा’ असे अनेक संदेश या बालचित्रकारांनी छत्र्यांवर रेखाटले. या छत्र्या हीच मुले वापरत असल्याने यातून कित्येक लोकांपर्यंत आपोआप चांगले संदेश पोहोचवणार आहेत, असेही कांबळी यांनी स्पष्ट केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZLPBD
Similar Posts
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान मुंबई : ‘लेक्सस’तर्फे लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया (एलडीएआय) या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी १२ विविध वर्गवारींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी ७००हून अधिक प्रवेशिका ‘लेक्सस’कडे आल्या होत्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language